Connect with us

गोवा खबर

ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीनच्या पहिल्या स्तरावरील तपासणीची बैठक संपन्न

Published

on

Spread the love

गोवा खबर:उत्तर गोवा जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी, श्री अंकित यादव, आयएएस यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर गोवा, जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात २०२७ मध्ये होणाऱ्या गोवा राज्य विधानसभा निवडणूकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट् मशीनची तपासणी करण्यासंदर्भात चर्चा झाली.

उत्तर गोवा जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी भारतीय निवडणूक आयोगाची मार्गदर्शक तत्वांनुसार मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीस ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट् मशीनच्या तपासणी संदर्भात माहिती दिली आणि मार्गदर्शन केले. उत्तर गोवा उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्री सफल शेट्ये यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट् मशीनच्या तपासणी आमि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांवर एक सादरीकरण केले. या बैठकीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट् मशीनची तपासणी प्रक्रियेदरम्यान पारदर्शकता आणि विहित कार्यपद्धतीचे काटेकोर पालन करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

या बैठकीला आरजीपीचे प्रतिनिधी श्री वीरेश बोरकर, भाजपचे प्रतिनिधी श्री पुंडलिक राऊत देसाई आणि आयएनसीचे प्रतिनिधी श्री ई. अल्टिन्हो गोम्स उपस्थित होते. उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक आणि ईव्हीएम व व्हीव्हीपीएटीचे नोडल अधिकारी श्री भूषण सावईकर, आणि ईव्हीएम व व्हीव्हीपीएटीचे सहायक नोडल अधिकारी श्री अभिजीत निकम हेही बैठकीस उपस्थित होते.