Connect with us

गोवा खबर

सक्रिय प्रशासन हे सक्रिय सरकारचे लक्षण: शिरोडकर

Published

on

Spread the love

गोवा खबर:जलस्त्रोतमंत्री मंत्री श्री सुभाष शिरोडकर यांनी “सक्रिय प्रशासन हे सक्रिय सरकारचे लक्षण आहे  असे सांगून श्री शिरोडकर यांनी फोंडा तालुक्याच्या तक्रारींचे निवारण करण्याची वैयक्तिक जबाबदारी घेणार आणि नागरिकांचे समस्या जाणून घेण्यासाठी दर मंगळवारी संध्याकाळी फोंडा नगरपालिकेत उपलब्ध राहतील असे सांगितले.


फोंडा येथील क्रांती मैदानावर ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात श्री शिरोडकर यांनी राष्ट्रीय तिरंगा फडकविला आणि पोलीस संचलनाची पाहणी करून मानवंदना दिली.  


सुरवातीस श्री शिरोडकर यांनी क्राती मैदानावरील हुतात्मा स्मारकावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

अंतरुझ महल फोंडा हे एक शैक्षणिक केंद्र असल्याचे सांगून श्री शिरोडकर यांनी शैक्षणिक संस्थांना राष्ट्र उभारणीत योगदान देऊ शकणारे आणि फोंडा व गोव्याला राष्ट्रीय स्तरावर नेऊ शकणारे विद्वान निर्माण करून हा वारसा पुढे चालवावा असे आवाहन केले. ३० ऑगस्टपर्यंत फोंडा पिण्याच्या पाण्याबाबतीत स्वयंपूर्ण होईल आणि जलस्त्रोत खाते हे वचन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करील, असे आश्वासन त्यानी तेथील रहिवाशांना दिले.

या कार्यक्रमाला एनआरआय आयुक्त श्री नरेंद्र सावईकर, ६ टीटीआर कमांडिंग ऑफिसर शंतनू कौशिक, फोंडाचे नगराध्यक्ष श्री वीरेंद्र ढवळीकर