Connect with us

गोवा खबर

मोपा विमानतळ परिसरातील जमीन व्यवहारांची चौकशी; महाराष्ट्र सरकारचे आदेश

Published

on

Spread the love

गोवा खबर: मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर गेल्या तीन वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि सावंतवाडी परिसरात झालेल्या जमीन व्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने दिले आहेत.

महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, काही बाहेरील व्यक्तींनी शेतकरी असल्याचे भासवून कृषी जमीन खरेदी केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हे व्यवहार महसूल कायद्यातील संबंधित तरतुदींचे उल्लंघन करून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

याशिवाय, कृषी जमिनीवर आवश्यक झोनिंग परवानग्या न घेता बेकायदेशीर प्लॉटिंग करण्यात आल्याच्या तक्रारीही सरकारकडे आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

या संपूर्ण प्रकरणाची कोकण विभागीय आयुक्तांच्या (Konkan Commissioner) देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, चौकशी अहवालानुसार संबंधितांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Continue Reading