Connect with us

गोवा खबर

कुडचडे मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार : अमित पाटकर

Published

on

Spread the love

गोवा खबर : माजी गोवा प्रदेश काँग्रेस समिती (GPCC) अध्यक्ष अमित पाटकर यांनी आगामी विधानसभा निवडणूक कुडचडे मतदारसंघातून लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या मतदारसंघात आपण आधीपासूनच काम सुरू केले असून, पक्षाने उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीने निवडणूक लढवू, असे त्यांनी स्पष्ट केले.

अमित पाटकर म्हणाले की, मागील विधानसभा निवडणुकीत कुडचडे मतदारसंघात काँग्रेसचा पराभव 500 पेक्षा कमी मतांनी झाला होता. त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर GPCC अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. या काळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले.

त्यांनी सांगितले की, त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकली, तसेच 10 जिल्हा पंचायत जागांवर विजय मिळवला. या यशामागे पक्ष कार्यकर्त्यांचे आणि नेतृत्वाचे सामूहिक प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तर काय भूमिका असेल, असा प्रश्न विचारला असता अमित पाटकर म्हणाले, “पक्षाने तिकीट दिले नाही, तर त्याबाबत मी काय बोलणार असा प्रश्न केला.

या विधानामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील उमेदवारीबाबतच्या चर्चांना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.