Connect with us

गोवा खबर

स्वयंपूर्ण मित्रांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर : उत्तर गोवा जिल्हा मिनरल फाऊंडेशनने उत्तर गोव्यातील खाण उध्योग प्रभावित भागांमध्ये जिल्हा मिनरल फाऊंडेशनच्यावतीने अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमासंबंधी जागरूकता करण्यासाठी सांखळी येथील नगरपालिका सभागृहात कार्यक्रम आयोजित केला होता.

कार्यक्रमात, डॉ. सचिन तेंडुलकर यांनी जिल्हा मिनरल फाऊंडेशनच्या वतीने उत्तर गोव्यात खाण उध्योग प्रभावित भागांमध्ये हाती घेतलेल्या विविध विकास कार्यांची माहिती दिली. त्यांनी शिक्षण, आरोग्यसेवा, पिण्याचे पाणी, स्वच्छता, पायाभूत सुविधा, उपजीविका निर्मिती आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या क्षेत्रांतील उपक्रमांना सहकार्य देऊन खाणकाम-प्रभावित गावांमध्ये राहणाऱ्या लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी फाऊंडेशन कटिबद्ध असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना, डॉ. तेंडुलकर यांनी स्वयंपूर्ण मित्रांना आपापल्या गावातील प्राधान्यक्रमाच्या गरजा आणि कामे लक्षात घेऊन विकास प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यांनी स्वयंपूर्ण मित्रांना गावाच्या विकासासाठी सुनियोजित प्रस्ताव तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यास जिल्हा मिनरल फाऊंडेशनला सहकार्य करण्याची मागणी त्यांनी केली.

या जनजागृती कार्यक्रमात विविध सरकारी खात्यांचे प्रमुख, स्वयंपूर्ण मित्र, स्थानिक संस्थांचे प्रतिनिधी, अधिकारी आणि इतर हितधारकांनी भाग घेतला.

सुरवातीस  सदस्य सचिव रत्नकांत गोवेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. आपल्या स्वागतपर भाषणात, त्यांनी उत्तर गोवा जिल्हा मिनरल फाऊंडेशन ट्रस्टच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला आणि खाणकाम-बाधित भागातील स्थानिक समुदाय तसेच इतर हितधारकांना शिक्षित करण्यासाठी आणि त्यांच्या हितासाठी हा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे असे सांगितले. ट्रस्टच्या कल्याणकारी उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांनी सक्रिय जनसहभागाच्या महत्त्वावरही भर दिला.