गोवा खबर:तोरसे येथील शेट्येवाडा परिसरात चोरीची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, स्थानिक व्यावसायिक प्रकाश शेट्ये यांच्या डेकोरेशन साहित्याच्या गोडाऊनमध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश करून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे साहित्य लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.