Connect with us

गोवा खबर

सालियन हत्या प्रकरण : मुख्य आरोपी अक्षता एम.के.च्या पोलीस कोठडीत पाच दिवसांची वाढ

Published

on

Spread the love

गोवा खबर : कर्नाटकातील मालपे येथील व्यावसायिक संदीप सालियन यांच्या कथित हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षता एम.के. हिच्या पोलीस कोठडीत आणखी पाच दिवसांची वाढ करण्याचे आदेश म्हापसा न्यायालयाने दिले आहेत.

या प्रकरणाच्या तपासासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितल्यानंतर न्यायालयाने आरोपीची पोलीस कोठडी पाच दिवसांनी वाढवली.

या कालावधीत तपास अधिकारी आरोपीची अधिक चौकशी करणार असून, या गाजलेल्या हत्या प्रकरणातील विविध बाबींचा सखोल तपास सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच प्रकरणाशी संबंधित पुरावे आणि इतर तपशीलांचीही पडताळणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.