Connect with us

गोवा खबर

चांदेल भाजप बूथ समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर

Published

on

Spread the love

गोवा खबर:भारतीय जनता पक्षाच्या चांदेल बूथ समितीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. शक्तिप्रमुख रमेश मळीक तसेच पेडणे भाजप मंडळाध्यक्ष सिद्धेश पेडणेकर आणि पेडणे मतदारसंघ प्रभारी डॉ. सुखाजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली समितीची पुनर्रचना करण्यात आली. आगामी संघटनात्मक उपक्रम प्रभावीपणे राबविणे, बूथ स्तरावरील पक्ष संघटना अधिक बळकट करणे तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा समितीच्या स्थापनेमागील प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी अनंत भाईप यांची निवड करण्यात आली आहे.

कार्यकारिणी सदस्य म्हणून अभिमन्यू भाईप, प्रदीप गावस, रमेश गावस, सागर गावस, नरेश गावस, यशवंत गावस, अशोक घोगले, रघुनाथ गावस, नितेश नारुलकर, पृथ्वीराज गावस, बाळा शेटकर, बाळकृष्ण भाईप आणि प्रतीक गावस यांचा समावेश करण्यात आला आहे.

नव्या कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी तसेच बूथ स्तरावरील पक्षकार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. शक्तिप्रमुख रमेश मळीक यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाची विचारसरणी व केंद्र-राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने जनसंपर्क ठेवावा, असे आवाहन केले.