गोवा खबर : म्हापसा येथील हडफडे भागातील ‘बर्च बाय रोमियो लेन लाईट क्लब’ला उत्पादन शुल्क परवाना मिळवण्यासाठी कांदोळी आरोग्य केंद्राचा बनावट दाखला तयार केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी क्लबचे मालक लुथरा बंधू व अजय गुप्ता यांच्याविरुद्ध कोर्टात २३०६ पानांचे आरोपपत्र सादर केले आहे.
या तपासामध्ये पोलिसांनी विविध शासकीय कार्यालयांतील कागदपत्रे आणि तांत्रिक पुरावे गोळा केले असून, यामध्ये १०० हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत, ज्यात ५० सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.