Connect with us

गोवा खबर

‘डीडीएसएसवाय’ योजनेत घसघशीत वाढ

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्य सरकारने दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेअंतर्गत (DDSSY) विमा रक्कमेत मोठी वाढ केली आहे. आता तीन किंवा त्यापेक्षा कमी सदस्य असलेल्या लहान कुटुंबाला वार्षिक ४ लाख रुपयांचे, तर चार किंवा त्यापेक्षा अधिक सदस्य असलेल्या मोठ्या कुटुंबाला ६ लाख रुपयांचे विमा कवच मिळणार आहे.

गोवा आणि शेजारील राज्यांतील सुमारे ५० हून अधिक सरकारी व खाजगी रुग्णालये या योजनेशी जोडलेली आहेत. वाढत्या आरोग्य खर्चामुळे सामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबांना दिलासा देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असून, यासाठी ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.