Connect with us

गोवा खबर

राजकारण्यांची पाच वर्षांनी परीक्षा : मुख्यमंत्री

Published

on

Spread the love

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वेर्णा येथील आयडीसी हॉलमध्ये आयोजित ‘मेगा जॉब फेअर’ अंतर्गत तरुणांना नियुक्तीपत्रांचे वितरण केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, बदलत्या काळानुसार राजकारण्यांनाही दर पाच वर्षांनी जनतेसमोर परीक्षेला सामोरे जावे लागते.

त्यांनी तरुणांना ‘कालो, धालो, नाटक’ या मानसिकतेतून बाहेर पडून केवळ रोजगारापुरते मर्यादित न राहता कौशल्य विकासावर भर देण्याचे आवाहन केले. उद्योगमंत्री माविन गुदिन्हो आणि आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनीही तरुणांना नोकरीत सातत्य व प्रामाणिकपणा राखण्याचा सल्ला दिला.