Connect with us

गोवा खबर

गोव्यात आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट; २ ते ६ जुलैदरम्यान यलो अलर्ट कायम

Published

on

Spread the love

गोवा खबर: भारतीय हवामान विभागाच्या (IMD) गोवा केंद्राने राज्यासाठी पुढील सात दिवसांचा पावसाचा अंदाज आणि इशारा जारी केला आहे. त्यानुसार ३० जून आणि १ जुलै रोजी उत्तर व दक्षिण गोवा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

या दोन दिवसांत राज्यातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून ताशी ४० ते ५० किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.

त्यानंतर २ जुलै ते ६ जुलै या कालावधीत राज्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात उत्तर व दक्षिण गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

दरम्यान, जिल्हानिहाय पर्जन्यमानाच्या अंदाजानुसार ३० जून ते ६ जुलै या संपूर्ण कालावधीत गोव्यात बहुतांश ठिकाणी पावसाची नोंद होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.