Connect with us

गोवा खबर

ताळगावात रोडरेजचा थरार; मद्यधुंद तरुणांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा अमित पालेकर यांचा दावा

Published

on

Spread the love

गोवा खबर: गोवा काँग्रेसचे नेते  अमित पालेकर यांनी ताळगाव येथे शनिवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक रोडरेज प्रकाराबाबत गंभीर दावा केला आहे. मद्यधुंद तरुणांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असून, ही घटना जीवावर बेतणारी होती, असे त्यांनी म्हटले आहे.

पालेकर यांनी सांगितले की, पोलिसांचे वाहन दिसताच संबंधित तरुणांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी स्वतः त्यांच्या कारचा क्रमांक नोंदवून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.

तथापि, संबंधित तरुणांच्या पालकांनी विनंती केल्यामुळे आपण या प्रकरणात पुढील तक्रार नोंदविणार नसल्याचे पालेकर यांनी स्पष्ट केले.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालेकर यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करत, “गोवा आता ‘मिर्झापूर’पेक्षा काही वेगळा राहिलेला नाही,” अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.