गोवा खबर : माजी महापौर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेंद्र फुर्तादो यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पणजी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधत ‘बाबूश देव आहे का?’ असा सवाल केला आणि त्यांचे राजकीय आव्हान स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण निश्चितपणे पणजीतून निवडणूक लढवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपण नेहमीच पक्षाशी एकनिष्ठ राहिलो असून कधीही पक्ष बदललेला नाही, असा दावा फुर्तादो यांनी केला आहे. या विधानामुळे २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पणजीतील राजकीय वातावरण आतापासूनच तापू लागल्याचे संकेत मिळत आहेत.