Connect with us

गोवा खबर

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज

Published

on

Spread the love

गोवा खबर:मुलांच्या विविध क्षेत्रातील असामान्य कतृत्वाची दखल घेण्यासाठी भारत सरकारच्यावतीने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हा महत्वाचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. गणवान तरूण मुलांचा सन्मान करण्यासाठी सुरू केलेला हा पुरस्कार शौर्य,खेळ, समाज सेवा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, कला आणि संस्कृती अशा सहा वर्गात देतात. नवी दिल्लीत विशेषसोहण्यात भारताच्या राष्ट्रपतीहस्ते हे पुरस्कार देण्यात येतात. ५ वर्षापेक्षा अधिक वय आणि १८ वर्षाखालील (३१ जुलै २०२६ पर्यंत) कोणतीही मुले जी भारतीय नागरिक आहेत आणि भारतात राहतात ती या पुरस्कारासाठी पात्र आहेत. तसेच कार्य घटना, कर्तव्य अर्ज, शिफारशीच्या शेवटच्या तारखेपर्यंत  २ वर्षाच्या कालावधीच्याआत असावा. अर्दार याअगोदर या पुरस्काराच्या कोणत्याही वर्गात पुरस्कार प्राप्त झालेला नसावा.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी कोणतीही व्यक्ती किंवा संस्था असामान्य कतृत्वान मुलांची शिफारस करू शकतात. तसेच मुलेही स्वताच्या शिफारसीव्दारे अर्ज करू शकतात. तसेच केंद्रिय मंत्री कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, सर्व राज्ये, संघप्रदेशांचे मुख्यमंत्री, राज्यपाल, नायब राज्यपाल, प्रशासक, खासदार, केंद्र सरकारची मंत्रालये, विभाग, राज्य, संघप्रदेशाचे सरकारी विभाग, राज्य, संघप्रदेशाच्या महिला आणि बाल विकास , समाज कल्याण खात्यांचे प्रधान सचिव, जिल्हाधिकारी, केंद्रिय विद्यालय संघटना, नवोदय विध्यालय समितीखालील शैक्षणिक संस्था, शाळांकडून शिफारशी मागविण्यात येत आहेत.

शिफारशी निश्चित करताना शिपारस केलेले मूल राष्ट्रीय पातलीवरील पुरस्कारासाठी असामान्य तऱ्हेने पात्र आहे, त्याचे कर्तव्य समाज सेवेस लागू होते अशा गोष्टीसह कतृत्वान मुली, दुर्बल घटक, एससी,एसटी समाज आणि दिव्यांग मुलांचा विचार होईल.

ऑनलाईन अर्ज नामांकने स्वीकारण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ अशी आहे. अधिक माहितीसाठी माहितीराष्ट्रीय पुरस्कार पोर्टलास (https://awards.gov.in). भेट द्यावी

गोव्याच्या राज्यपालामार्फत आपले नामांकन पाठविण्यास इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी आपली सविस्तर माहिती, दाखला आणि कतृत्वाच्या माहितीची हार्ड कॉपी महिला आणि बाल विकास संचालनालय, २ रा मजला, शिक्षण खात्याची जुनी इमारत, १८ जून मार्ग,पणजी गोवा या पत्त्यावर ४ जुलै २०२६ पर्यंत सुपूर्द करावी त्यानंतर असे अर्ज लाकभवनात पाठविले जातील.