Connect with us

गोवा खबर

औद्योगिक कामगारांसाठी योजना

Published

on

Spread the love

गोवा खबर:गोवा कामगार कल्याण मंडळ गोव्यातील औद्योगिक कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करते. २०२६ – २०२७ वर्षासाठी राज्यातील पात्र औध्योगिक कामगारांना या योजनेखाली मदत आणि लाभ देण्याचा मंडळाचा प्रस्ताव आहे.

या योजनांमध्ये औद्योगिक कामगार, कर्मचाऱ्यांच्या शाळेत जाणाऱ्या मुलांना पुस्तके, पुस्तके खरेदी करण्यासाठी, तसेच इयत्ता  पहिली ते  चौथीमध्ये शिकणाऱ्या मुलांना गणवेशाचा एक जोड पुरविण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे, शाळा आणि महाविध्यालयांमध्ये शिकणाऱ्या मुलाना शिष्यवृत्ती योजना, मंडळ/विद्यापीठांद्वारे आयोजित अंतिम परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कामगारांच्या पाल्यांना त्यांच्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारावर प्रोत्साहनपर रक्कम देण्याची योजना, तसेच कामगार/कर्मचाऱ्यांच्या मुली असलेल्या आणि शिक्षणाच्या कोणत्याही क्षेत्रात इयत्ता पाचवी व त्यापुढील वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना शाळा/महाविद्यालयांमधील उपस्थितीच्या आधारावर प्रोत्साहन/आर्थिक सहाय्य देण्याची योजना ज्यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर, २०२६ अशी आहे.

त्याचप्रमाणे, चष्मा खरेदीसाठी आर्थिक सहाय्य, खेळांचे आयोजन, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम, सहल-सह-अभ्यास दौरा, मुलांच्या फायद्यासाठी पाळणाघर योजना, गोवा कामगार कल्याण अधिनियम, १९८६ अंतर्गत समाविष्ट कर्मचाऱ्यांच्या क्षयरोगावरील (टीबी) घरपोच उपचारांसाठी योजना, कामावरून कमी केलेल्या कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याची योजना आणि स्त्री सखी योजना (सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनचा पुरवठा), तसेच औद्योगिक कामगार/कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या मानसिकदृष्ट्या विकलांग आणि स्पास्टिक/ऑटिस्टिक मुलांच्या उपचारांसाठीच्या योजना आहेत.

महिला औद्योगिक कामगारांसाठी प्रसूतीच्या तारखेपासून सहा महिन्यांपर्यंतचे बाल संगोपन लाभ, आणि औद्योगिक कामगाराच्या मृत्यूनंतर अवलंबितांना सहाय्य देण्याच्या योजनेसाठी, कामगाराच्या निधनाच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे, तसेच छाटणी झालेल्या कामगारांना सहाय्य करण्याची योजना आणि कर्मचाऱ्यांना नसबंदीसाठी अतिरिक्त आर्थिक भरपाई देण्याच्या योजना मंडळाद्वारे राबविण्यात येतात.

योजनेचा लाभ मिळविण्यासाठी कामगार सतत सेवेत असावा आणि निदीस योगदान देणारा असावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी औध्योगिक कामगार आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या मालकामार्फत  सचिव, गोवा कामगार कल्याण मंडळ, श्रम शक्ती भवन,  चौथा मजला, पाटो प्लाझा, पणजी या पत्त्यावर अर्ज करावा.