गोवा खबर : भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) ‘घर घर चलो अभियान’ अंतर्गत फातोर्डा मंडळाच्या कार्यकर्त्यांसह परिसरातील विविध मान्यवर व्यक्तींना भेट देऊन संवाद साधण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत भारताने केलेल्या उल्लेखनीय प्रगतीविषयी चर्चा करण्यात आली.
या भेटीगाठीदरम्यान नागरिकांशी विविध विकासकामे, सुधारणा आणि केंद्र सरकारच्या उपक्रमांबाबत सविस्तर संवाद साधण्यात आला. अनेक नागरिकांनी या योजनांचा त्यांच्या जीवनावर झालेला सकारात्मक परिणाम अनुभवातून सांगितला.
तसेच, विकसित भारत २०४७ या संकल्पनेच्या दिशेने वाटचाल करताना नागरिकांच्या अपेक्षा, सूचना आणि मौल्यवान अभिप्राय जाणून घेण्याची संधीही या अभियानातून मिळाली. नागरिकांनी देशाच्या विकासासाठी विविध सूचना मांडत आपला सहभाग नोंदविला.
भाजपच्या ‘घर घर चलो अभियान’द्वारे पक्ष कार्यकर्ते थेट नागरिकांपर्यंत पोहोचून केंद्र सरकारच्या कामगिरीची माहिती देत असून, लोकांच्या अपेक्षा आणि मतांची नोंद घेत आहेत.