Connect with us

गोवा खबर

हळदोणेतील ‘माझे घर’च्या फाईल्स मंजुरीच्या प्रतीक्षेत : टिकलो

Published

on

Spread the love

गोवा खबर : माझे घर योजनेअंतर्गत हळदोणा मतदारसंघातील कोमुनिदादअंतर्गत येणाऱ्या तसेच प्रलंबित ठेवण्यात आलेल्या फाईल्स तातडीने मंजूर करण्यात याव्यात, अशी मागणी हळदोणा मतदारसंघ भाजपच्यावतीने करण्यात आली.

माजी आमदार तसेच पक्षाचे उपाध्यक्ष ग्लेन टिकलो यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उत्तर गोवा कोमुनिदादचे प्रशासक पांडुरंग गाड यांची भेट घेतली. यावेळी फ्रँकी कार्व्हालो, सरचिटणीस सागर मावळणकर, युवा अध्यक्ष भोसले उपस्थित होते.

हळदोणा मतदारसंघातील अनेक पंचायतीतल्या ‘माझे घर’ योजनेअंतर्गतच्या अनेक फाईल्स मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याने त्या तातडीने मंजूर करण्यात याव्यात, अशी मागणी शिष्टमंडळाकडून करण्यात आली. नास्नोळा, बस्तोडा तसेच इतर पंचायत क्षेत्रातील फाईल्स मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती टिकलो यांनी पत्रकारांना दिली. काही फाईल्सवर त्रुटी असून इतर राहिलेल्या फाईल्स महिनाभरात मंजूर करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्याचे टिकलो म्हणाले.