गोवा खबर : गोवा प्रदेश काँग्रेस समिती (GPCC) अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री चर्चिल अलेमाव, वलांका अलेमाव आणि साविओ अलेमाव यांनी जीपीसीसी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी अलेमाव कुटुंबीयांनी गिरीश चोडणकर यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी आणि आगामी काळातील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी त्यांनी चोडणकर यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
या भेटीदरम्यान पक्ष संघटना, राज्यातील राजकीय परिस्थिती आणि काँग्रेसच्या आगामी वाटचालीबाबतही अनौपचारिक चर्चा झाल्याची माहिती मिळाली.
गिरीश चोडणकर यांनी चर्चिल अलेमाव, वलांका अलेमाव आणि साविओ अलेमाव यांचे आभार मानत त्यांच्या शुभेच्छांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.