Connect with us

गोवा खबर

नेपाळ-उत्तर प्रदेश ते थेट गोवा आंतरराज्य ड्रग रॅकेटचा पर्दाफाश; मुख्य सूत्रधार मन्ना मलिकला अटक

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने (CID) उत्तर प्रदेश पोलिसांच्या संयुक्त मदतीने आंतरराज्य अंमली पदार्थ तस्करीच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. नेपाळ आणि उत्तर प्रदेशच्या सीमावर्ती भागातून थेट गोव्यापर्यंत पसरलेल्या या ड्रग नेटवर्कचा मुख्य सूत्रधार इखलाक अहमद उर्फ मन्ना मलिक याच्या उत्तर प्रदेशातील मन्सूरगंज परिसरात मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ३० मे रोजी सापळा रचून ही मोठी कारवाई केली असून, संशयित मन्ना मलिकला ट्रान्झिट रिमांडवर गोव्यात आणण्यात आले आहे.

या कारवाईची पाळेमुळे २८ मे रोजी झालेल्या एका अटकेशी जोडलेली आहेत, जेव्हा गोवा पोलिसांनी बेती येथून अर्जुन बिश्वकर्मा आणि चेतकांत ओली या दोन नेपाळी नागरिकांना अटक केली होती. त्यांच्याकडून ३९.८८ ग्रॅम हेरॉईन आणि ८.८८ लाख रुपयांचा इतर माल जप्त करण्यात आला होता. या दोन्ही आरोपींच्या चौकशीतूनच मुख्य पुरवठादार मन्ना मलिकचे नाव समोर आले होते. दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालय आणि एनसीबीच्या आकडेवारीनुसार गोव्यातील ड्रग विरोधी कारवायांना वेग आला आहे. गोव्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत २०१९ मध्ये २३६, २०२० मध्ये १९८, २०२१ मध्ये १५५, २०२२ मध्ये १८७, २०२३ मध्ये २०२ आणि २०२४ मध्ये अंदाजे १७० हून अधिक संशयितांना अटक करण्यात आली आहे. तसेच, फेब्रुवारी २०२६ मध्ये दक्षिण गोवा पोलिसांनी १ कोटी २० लाख रुपयांचे कोकेन, चरस आणि एमडीएमए जप्त करून मोठी कारवाई केली होती.