Connect with us

गोवा खबर

गोवा घटक राज्य दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा घटक राज्य दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गोमंतकीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. गोवा हा केवळ समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि आदरातिथ्यासाठीच नव्हे, तर शिक्षण, तंत्रज्ञान, स्टार्टअप्स आणि शाश्वत विकासातील उल्लेखनीय प्रगतीसाठीही ओळखला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या संदेशात गोव्याने नवोपक्रम, पर्यावरण संवर्धन आणि सर्वसमावेशक विकासासाठी घेतलेल्या वचनबद्धतेचे कौतुक केले. विकसित भारताच्या निर्मितीत गोवा महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गोव्याची सांस्कृतिक ओळख आणि विकासाचा समतोल राखत राज्याने प्रगतीची वाटचाल कायम ठेवावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच राज्यातील नागरिकांना निरंतर समृद्धी, आनंद आणि यश लाभावे, अशा शुभेच्छा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्या.