Connect with us

गोवा खबर

विधानसभा निवडणूक फेब्रुवारी २०२७ मध्येच होणार: मुख्यमंत्री सावंत

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्याची आगामी विधानसभा निवडणूक फेब्रुवारी २०२७ मध्येच होईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सत्ताधारी आमदारांच्या बैठकीत स्पष्ट केले आहे. या बैठकीत निवडणुकीची तयारी, राज्यातील राजकीय परिस्थिती आणि रणनीतीवर सखोल चर्चा झाली.

भाजपने राज्यात सध्या ‘ग्राउंड असेसमेंट’ आणि बूथ पातळीवर काम सुरू केले असून आमदारांना आपापल्या मतदारसंघात सक्रिय राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. भाजप आणि मगोप युतीबाबत राजकीय विश्लेषकांमध्ये तर्कवितर्क सुरू असले, तरी ही युती कायम राहण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी संगें मतदारसंघ एसटीसाठी राखीव करण्यापूर्वी आपल्याला विश्वासात घ्यावे, अशी मागणी केली आहे.