Connect with us

गोवा खबर

पणजीतील जाहीर सभेमुळे मराठी राजभाषा आंदोलनाला मोठी उभारी; वेलिंगकर यांचे प्रतिपादन

Published

on

Spread the love

गोवा खबर : मराठी राजभाषा निर्धार समितीच्या वतीने पणजीतील आझाद मैदानावर नुकतीच एक मोठी जाहीर सभा पार पडली. या सभेमुळे गोव्यातील मराठी राजभाषा आंदोलनाला पुन्हा एकदा मोठी उभारी मिळाली असल्याचे प्रतिपादन समितीचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांनी केले आहे.

या सभेला विविध क्षेत्रांतील अनेक नामांकित व्यक्तींनी व्यासपीठावर उपस्थित राहून आपला जाहीर पाठिंबा दर्शवला, ज्याबद्दल समितीच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. सभेला उपस्थित राहिलेल्या मान्यवरांमध्ये वास्तुशास्त्रज्ञ कमलाकर साधले, इतिहास संशोधक उल्हास प्रभूदेसाई, संतसाहित्य अभ्यासक डॉ. गोविंदराव काळे, लेखक लक्ष्मण पित्रे, उद्योजक अनिल खंवटे, डॉ. दत्ताराम देसाई, दिलीप धारवाडकर, डॉ. सूरज काणेकर, प्रदीप घाडी आमोणकर, रमेश नाईक, संजय हरमलकर, प्रा. पौर्णिमा केरकर, डॉ. अनुजा जोशी, रवींद्र आमोणकर, सुजन नाईक, शुभाताई सावंत, मीरा प्रभू वेर्लेकर, शैलेंद्र वेलिंगकर, प्रा. डॉ. गोविंद भगत, माजी महापौर अशोक नाईक यांच्यासह अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश होता. तसेच काही अपरिहार्य कारणांमुळे सभेला उपस्थित राहू न शकलेल्या अनेक मान्यवरांनी लेखी संदेश पाठवून या आंदोलनाला आपला पाठिंबा दिला आहे. या अभूतपूर्व प्रतिसादामुळे गोव्यात मराठीला राजाश्रय मिळवून देण्याच्या चळवळीला नवीन बळ मिळाले असल्याचे वेलिंगकर यांनी स्पष्ट केले.