Connect with us

गोवा खबर

मंत्रिपदाचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील; आमदार मायकल लोबो

Published

on

Spread the love



गोवा खबर:गोव्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मंत्रिमंडळातील बदलांचा किंवा नव्या नियुक्त्यांचा निर्णय सर्वस्वी पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री घेतील,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.


पक्षश्रेष्ठींकडे अधिकार: लोबो म्हणाले की, गोव्यातील भाजपचे कोअर कमिटी सदस्य, दामू नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय नेतृत्व मिळून मंत्रिपदाबाबतचा अंतिम निर्णय घेतील.


डीलायला लोबो यांच्या क्षमतेवर विश्वास:शिवोलीच्या आमदार

डीलायला लोबो यांच्या मंत्रिपदाच्या चर्चेवर बोलताना मायकल लोबो म्हणाले, “डीलायला या सक्षम आहेत. त्यांनी १५ वर्षे सरपंच म्हणून ग्रासरूट लेव्हलवर काम केले आहे. त्यामुळे एखादे मंत्रालय सांभाळण्याची त्यांची पूर्ण तयारी आणि क्षमता आहे.”


लोबो पुढे म्हणाले की, जे आमदार निवडून आले आहेत आणि ज्यांच्याकडे लोकांची कामे करण्याची क्षमता आहे, त्या प्रत्येकाला मंत्रिपदाची संधी मिळू शकते. हा निर्णय केवळ एका मतदारसंघापुरता मर्यादित नसून संपूर्ण गोव्याच्या हिताचा विचार करून घेतला जातो.


सध्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला असून, मायकल लोबो यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.