Connect with us

गोवा खबर

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘लेन्सकार्ट’च्या हिंदूविरोधी धोरणाचा फोंडा येथे निषेध

Published

on

Spread the love

गोवा खबर : ‘लेन्सकार्ट’ या चष्म्यांच्या विक्री करणार्‍या आस्थापनाने हिंदु कर्मचार्‍यांना धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतिके वापरण्यास बंदी घातली होती, तर मुसलमानांना त्यासाठी अनुमती देण्यात आली होती. हिंदु जनजागृती समितीने ‘लेन्सकार्ट’च्या हिंदूविरोधी धोरणाचा फोंडा येथे निषेध नोंदवला आहे. हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळातील सदस्यांनी या वेळी वरचाबाजार, फोंडा येथील ‘लेन्सकार्ट’ शोरूममधील सर्व कर्मचार्‍यांना टिळा लावून आपला विरोध दर्शवला.

या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये सत्यविजय नाईक, हिंदुत्ववादी संजय घाटे,गोरक्षक राजीव झा, ‘बजरंग दला’चे सौरभ आंबले, सुचेन्द्र अग्नी, दादा कोलवेकर, देसाई, शिवानंद वेगिकोळ, शिवदत्त नाडकर्णी आणि अन्य धर्मप्रेमी यांचा सहभाग होता.

देशभरातील हिंदू ‘लेन्सकार्ट’च्या या हिंदुविरोधी धोरणाचा संघटितपणे निषेध करत आहे. याविरोधामुळे अखेर ‘लेन्सकार्ट’ आस्थापनाने हिंदूंची क्षमा मागितली आहे आणि आता हिंदु कर्मचार्‍यांना बिंदी, टिळा, कुंकू, मनगटावरील दोरा, मंगळसूत्र, कडा, पगडी आदी प्रतिके वापरण्याची अनुमती दिली आहे. हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदू ‘लेन्सकार्ट’ आस्थापनाच्या या पालटलेल्या धोरणाचे स्वागत करत आहे.