शाळा-महाविद्यालयीन परिसरात विक्री होत असल्याबद्दल खासदार फर्नांडिस यांची चिंता
गोवा खबर : राज्यात वाढत चाललेल्या अंमली पदार्थांच्या (ड्रग्ज) तस्करीचा मुद्दा खासदार विरियातो फर्नांडिस यांनी संसदेत नियम ३७७ अंतर्गत उपस्थित केला. गोव्यातील तरुण पिढी या विळख्यात अडकत असल्याचे त्यांनी नमूद केले.
- धोका : बंदी घातलेले पदार्थ आजही सहज उपलब्ध होत असून शाळांच्या परिसरात त्यांची विक्री होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. केवळ कायदा-सुव्यवस्था म्हणून न पाहता, समाजाच्या भविष्यासाठी हा प्रश्न गंभीर असल्याचे सांगत त्यांनी केंद्रीय यंत्रणांकडून (NCB) कडक कारवाईची मागणी केली.