गोवा खबर : दक्षिण जिल्ह्यातील २१ फोंडा विधानसभा मतदारसंघाच्या निर्वाचन अधिकाऱ्यांनी ज्या मतदारांना टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे, अशा निवडणूक कामावरील मतदारांच्या प्रवर्गासाठी टपाल मतपत्रिकेसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
मतदान पथके, निवडणूक कामावरील अधिकारी; वरिष्ठ दंडाधिकारी, भरारी पथक, एआरओ, एईआरओ आणि मतदानाच्या दिवशी निवडणूक कामात गुंतलेले निवडणूक कर्मचारी जसे खाजगी व्यक्ती आणि निम-सरकारी कर्मचारी आणि निवडणूक कामावर असलेले पोलीस कर्मचारी, गोवा आयआरबी आणि होमगार्ड या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
निवडणूक कामावर असलेले मतदार ज्या मतदारांनी फॉर्म-१२ भरून पोस्टल बॅलेट सुविधेची निवड केली आहे त्यांना २९, ३० आणि ३१ मार्च २०२६ रोजी सुविधा केंद्र, कोर्ट रूम, फोंडा मामलेदार कार्यालय, तिसरा मजला, सरकारी इमारत संकुल, फोंडा, गोवा येथे मतदान करायला मिळेल.