Connect with us

गोवा खबर

पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत 30 लाख कुटुंबांनी छतावर सौर ऊर्जा पॅनल उभारल्याबद्दल पंतप्रधानांनी केले कौतुक

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील 30 लाख कुटुंबाना छतावरील सौरऊर्जेने सक्षम बनवल्याच्या  कामगिरीचे  कौतुक केले आणि हा भारताच्या स्वच्छ ऊर्जा प्रवासातील एक प्रशंसनीय टप्पा असल्याचे नमूद केले.

पंतप्रधानांनी छतावर सौर ऊर्जा पॅनेल उभारणाऱ्या सर्व लाभार्थ्यांचे कौतुक केले आणि हे पाऊल नागरिकांमध्ये बचत, शाश्वतता आणि स्वयंपूर्णतेला चालना देत असल्याचे नमूद केले.

ही योजना ऊर्जा-सुरक्षितता आणि भविष्यासाठी हरित भारत निर्माण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा अविभाज्य भाग आहे, यावर  पंतप्रधान  मोदी यांनी भर दिला.