Connect with us

गोवा खबर

नेदरलँड्सचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल रॉब जेटन यांचे पंतप्रधान मोदी यांनी केले अभिनंदन

Published

on

Spread the love

गोवा खबर : नेदरलँड्सचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल रॉब जेटन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

भारत आणि नेदरलँड्समधील विविध क्षेत्रांमध्ये असलेल्या व्यापक संबंधांवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. उभय  देशांमधील आणि तेथील लोकांचा-लोकांमधील वाढत्या संबंधांना आणखी गती देण्यासाठी पंतप्रधान जेटन यांच्याबरोबर  एकत्रित  काम करण्यास आपण  उत्सुक असल्याचे पंतपधान  मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाज माध्‍यमावर लिहिले; “नेदरलँड्सचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल रॉब जेटन यांचे अभिनंदन. भारत आणि नेदरलँड्सचे विविध क्षेत्रांमध्ये व्यापक सामायिक संबंध आहेत. दोन्ही देशांमधील आणि लोकां-लोकांमधील  वाढत्या संबंधांना आणखी गती देण्यासाठी आपल्याबरोबर एकत्रित काम करण्यास उत्सुक आहे.”