- बेतूल येथे ओएचएसएसएआय ग्लोबल कॉन्क्लेव्हचे उद्घाटन; ‘सागर सेतू’ची पाहणी
गोवा खबर : गोव्यातील पायाभूत सुविधा आणि बंदर विकासामुळे राज्याला नवीन आर्थिक संधी प्राप्त होत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. बेतूल येथील ओएनजीसी (ONGC) च्या ॲडव्हान्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित ‘ओएचएसएसएआय ग्लोबल कॉन्क्लेव्ह २०२६’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी बेतूल येथील ओएनजीसीच्या ‘सागर सेतू’ प्रकल्पाची पाहणी केली आणि ५.५ मेगावॅट मायक्रो ग्रीड यंत्रणेची प्रशंसा केली. ते म्हणाले की, हा प्रकल्प स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे. नवीन झुआरी पुलामुळे आणि लॉजिस्टिक पार्क्समुळे उत्तर आणि दक्षिण गोव्यातील अंतर कमी झाले असून, यामुळे पर्यटनासोबतच उद्योगांनाही मोठी चालना मिळणार आहे.