गोवा खबर : कुर्टी येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे नाव देण्यात आले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि क्रीडामंत्री यांच्या उपस्थितीत नामकरण सोहळा पार पडला.
या प्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की, रवी नाईक यांनी गोव्याच्या राजकीय, सामाजिक व क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या नावाने क्रीडासंकुल ओळखले जावे, ही योग्य श्रद्धांजली आहे.