Connect with us

गोवा खबर

पंडित दीनदयाळ उपाध्यायजींना पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंडित दीनदयाळ उपाध्याय जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. सद्गुणांच्या मूल्यांमध्ये रुजलेली त्यांची तत्वे आणि विचार देशाच्या प्रत्येक पिढीसाठी तेजोमय मार्गदर्शन करत राहतील असे मोदी यांनी म्हटले आहे.

आपल्या एक्स पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे: मातृभूमीचे अनन्यसाधारण भक्त पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली. त्यांची सद्गुणांच्या मूल्यांवर आधारित तत्त्वे आणि विचार या देशातील प्रत्येक पिढीसाठी मार्गदर्शन करत  राहतील.