Connect with us

गोवा खबर

गोमेकॉमध्ये ओपीडीसाठी आता ‘ऑनलाईन’ बुकिंग; रुग्णांना दिलासा

Published

on

Spread the love

गोवा खबर : बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांच्या लांबच लांब रांगा कमी करण्यासाठी सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ४ फेब्रुवारी २०२६ पासून गोमेकॉमध्ये ऑनलाईन ओपीडी (OPD) अपॉईंटमेंट सेवा अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे.

सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, ईएनटी (ENT), अस्थिरोग (Orthopedics) आणि त्वचा रोग (Dermatology) या पाच विभागांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्येक विभागासाठी दररोज १०० स्लॉट्स राखीव ठेवण्यात आले आहेत.

रुग्णांना गोमेकॉच्या अधिकृत संकेतस्थळावरून सात दिवस आधी आपले बुकिंग करता येईल. यासाठी नवीन रुग्णांना १०० रुपये नोंदणी शुल्क भरावे लागेल, जे दोन वर्षांसाठी वैध असेल. या सुविधेमुळे पहाटेपासून रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचणार असून, वेळेत उपचार मिळण्यास मदत होईल.