Connect with us

गोवा खबर

विठ्ठल पारवाडकर यांच्या अष्टावतार व मोहिनी  पुस्तकांचे रविवारी लोकार्पण 

Published

on

Spread the love
गोवा खबर: होंडा  सत्तरी येथील नाट्यलेखक विठ्ठल गावडे पारवाडकर यांनी लिहिलेल्या मोहिनी  ( सामाजिक कादंबरी)  व अष्टावतार ( पौराणिक संगीत  आठ एकांकिका संग्रह) या दोन पुस्तकांचे लोकार्पण  रविवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी केले जाणार आहे. कांपाल पणजी येथे आयोजित गोवा पुस्तक महोत्सवांमध्ये  आॉथर्स  कॉर्नर या दालनांमध्ये सकाळी ११.१५. वाजता हा  लोकार्पण सोहळा होणार आहे.
या सोहळ्याला राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच होंडा पंचायतीचे सरपंच  शिवदास माडकर हे खास निमंत्रित म्हणून हजर राहतील. कादंबरी लेखक चंद्रकांत  म. गावस व गजानन देसाई मान्यवर  लेखक  पुस्तकावर संक्षिप्तपणे बोलतील . प्रकाशक वैभव फोंडेकर यांचीही यावेळी उपस्थिती असेल.
पारवाडकर यांची आतापर्यंत ३६  पुस्तके प्रकाशित झालेली असून त्यामध्ये २७ नाटकांचा समावेश आहे.  गोवा मराठी अकादमीचा २०२४ चा  विष्णू वाघ नाट्य पुरस्कार पारवाडकर त्यांना प्राप्त झालेला असून गोवा सरकारच्या मराठी विषयावरील सहावीच्या पुस्तकांमध्ये त्यांचा “स्वराज्याचे शिलेदार”  हा धडा यंदाच्या वर्षांमध्ये समावेश झालेला आहे. पारवाडकर यांना अनेक पुरस्कार मिळाले असून त्यांनी आतापर्यंत  सामाजिक, संतकालीन, ऐतिहासिक , काल्पनिक नाटके लिहिली आहेत. पत्रकार म्हणून कार्यरत आहेत.
साहित्यिकानी व वाचकांनी या पुस्तक लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन  करण्यात आले आहे .