केंद्रीय वित्त तसेच कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिनांक 1 फेब्रुवारी, 2026 रोजी संसदेत सादर केलेल्या 2026 – 27 च्या अर्थसंकल्पात गोवा राज्यासाठी मांडलेल्या तरतूदी
गोव्यासाठी केंद्रीय हस्तांतरणामध्ये मोठी वाढ केली गेली आहे
- कर हस्तांतरण :
- आर्थिक वर्ष 2026-27 साठी कर हस्तांतरण म्हणून 5,570 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे (अर्थसंकल्पीय अंदाज).
- सहाय्यक अनुदाने :
- गोव्यासाठी 2025-26 करता 1,364 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे (अर्थसंकल्पीय अंदाज).
| घटक |
2014-26 (कोटी रुपयांमध्ये) |
| कर हस्तांतरण |
36,903 |
| सहाय्यक अनुदाने |
9,988 |
राज्यांना भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य
- या योजनेअंतर्गत, राज्य सरकारांना 50 वर्षांच्या बिनव्याजी कर्जाच्या स्वरूपात विशेष सहाय्य दिले जाते, याअंतर्गत व्याजाचा खर्च पूर्णपणे केंद्र सरकार उचलते.
- हे वित्त आयोगाच्या शिफारशींच्या व्यतिरिक्त दिले जाणारे सहाय्य आहे.
- गोव्याकरता भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना मिळणाऱ्या विशेष सहाय्याअंतर्गत झालेले वितरण
(कोटी रुपयांमध्ये)
| 2020-21 |
2021-22 |
2022-23 |
2023-24 |
2024-25 |
2025-26 (जानेवारी 2026 पर्यंत) |
Total 2020-21 to 2025-26 (जानेवारी 2026 पर्यंत) |
| 98 |
111 |
573 |
695 |
1,267 |
1,279 |
4,022 |
गोव्यातील पायाभूत सुविधांसाठी केलेले प्रयत्न
रस्ते मार्ग :
- 30.06.2025 पर्यंत गोव्यामध्ये 299 कि.मी. पेक्षा जास्त लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले आहेत.
- भारतमाला परियोजनेच्या (Bharatmala Pariyojana) पहिल्या टप्प्यांतर्गत गोव्यामध्ये सुमारे 64 कोटी रुपये इतक्या एकूण भांडवली खर्चासह 26 कि.मी. लांबीचे राष्ट्रीय महामार्ग कॉरिडॉर विकसित केले गेले आहेत.
- जुलै 2024 : गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते राष्ट्रीय महामार्ग क्र. – 166S (NH-166S) वरील धारगळपर्यंतच्या मार्गावर 1,183 कोटी रुपये खर्चाच्या, 7 कि.मी. लांबीच्या 6 पदरी प्रवेश नियंत्रित रस्ते प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
रेल्वे :
- रेल्वेसाठी अर्थसंकल्पीय तरतूद
| # |
घटक |
2004-14 |
2014-24 |
| 1 |
सरासरी वार्षिक अर्थसंकल्पीय तरतूद (कोटी रु.) |
5,545 |
53,122 |
- 2014-24 या कालावधी दरम्यान प्रत्यक्ष कार्यान्वित झालेली कामे :
- 24 कि.मी. नवीन रेल्वे मार्ग
- 2009-14 दरम्यान 0 कि.मी. च्या तुलनेत 164 कि.मी. रेल्वे मार्गिकांचे विद्युतीकरण
- 11 रेल्वे उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग
- सुरू असलेले प्रकल्प (नवीन मार्गिका) : 2 प्रकल्प, 328 कि.मी., 5,585 कोटी रुपये.
- 2 वंदे भारत मार्ग सुरू झाले : गोवा (मडगाव) – मुंबई (जून 2023 मध्ये) आणि मंगळूर – मडगाव (डिसेंबर 2023 मध्ये).
- 03 स्थानके अमृत स्थानके म्हणून विकसित केली जाणार आहेत : मडगाव, सावरडे, वास्को – द – गामा.
हवाई मार्ग :
- आरसीएस उडान (प्रादेशिक दळणवळण योजना – उडे देश का आम नागरिक – RCS UDAN) या योजने अंतर्गत 3 नवीन हवाई मार्ग सुरू करण्यात आले.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2022 मध्ये गोव्यातील मोपा इथल्या हरितक्षेत्र आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले (सुमारे 2,870 कोटी रुपये खर्च करून हे विमानतळ उभारले आहे).
- गोवा विमानतळाचा प्रधानमंत्री कृषी उडान योजनेमध्ये (Krishi Udan Scheme) अंतर्भाव केला गेला आहे (शेतकऱ्यांना कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी मदत करण्याकरता).
पर्यटन :
- 28 नोव्हेंबर 2025 :
- पंतप्रधानांनी श्री संस्थान गोकर्ण पर्तगाली जीवोत्तम मठ इथे प्रभू श्री रामांच्या 77 फूट उंच कांस्य पुतळ्याचे अनावरण केले.
- मठाने विकसित केलेल्या रामायण थीम पार्क गार्डन या उद्यानाचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले.
- पंतप्रधानांनी विशेष टपाल तिकीट आणि विशेष स्मारक नाणे प्रकाशित केले, तसेच या निमित्ताने उपस्थितांना संबोधितही केले.
- स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत गोव्यामधील किनारपट्टी या संकल्पनेवर आधारित पर्यटन साखळी स्थळांच्या (Circuits) विकासासाठी 197 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेला मंजूरी दिली गेली.
- 6 फेब्रुवारी 2024 (गोवा) :
- पर्यटन विषयक जोडणी आणि भेट देणाऱ्यांना समृद्ध अनुभव घेता यावा या उद्देशाने पंतप्रधानांनी प्रवासी रोपवे प्रकल्पासह, पर्यटनाशी संबंधित विकासकामांची पायाभरणी केली.
- पंतप्रधानांनी 100 दशलक्ष लिटर प्रतिदिवस इतक्या क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची पायाभरणी केली, या प्रकल्पामुळे शहरी पाणीपुरवठा आणि सार्वजनिक उपयुक्ततेच्या पायाभूत सुविधांना बळकटी मिळणार आहे.
- स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत पणजी शहराची निवड केली आहे.
क्रीडा, कौशल्य आणि सागरी प्रशिक्षण विषयक पायाभूत सुविधा :
- 6 फेब्रुवारी 2024 (गोवा) :
- पंतप्रधानांनी राष्ट्रीय जलक्रीडा संस्थेच्या (National Institute of Water Sports) नवीन संकुलाचे उद्घाटन केले, या संकुलामुळे क्रीडा प्रशिक्षण आणि पाण्याशी संबंधित असलेली पर्यटन विषयक कौशल्यांना बळकटी मिळणार आहे.
- पंतप्रधानांनी ओएनजीसी संस्थेतील एकात्मिक सागरी बचाव प्रशिक्षण केंद्राचे (Integrated Sea Survival Training Centre) उद्घाटन केले, या प्रशिक्षण केंद्रामुळे अपतटीय सुरक्षा आणि सागरी कौशल्य विकासाला चालना मिळणार आहे.
शिक्षण आणि तंत्रज्ञान संस्था :
- 6 फेब्रुवारी 2024 (गोवा) : विकसित भारत, विकसित गोवा 2047 या कार्यक्रमांतर्गत पंतप्रधानांनी गोवा इथल्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (NIT) स्थायी संकुलाचे उद्घाटन केले.
- डिसेंबर 2018 मध्ये या संकुलाच्या कामाची पायाभरणी करण्यात आली होती. या संकुलाची उभारणी म्हणजे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या उच्च तंत्रज्ञानविषयक प्रकल्प पूर्णत्वाला गेल्याचे द्योतक ठरले आहे.
डिजिटल जोडणी आणि दूरसंवाद :
- 29 सप्टेंबर 2025 (मोरपिला, केपे तालुका, दक्षिण गोवा) : पंतप्रधानांनी 4G मोबाईल टॉवरचे उद्घाटन केले, या टॉवरमुळे दूरसंवाद जोडणी मजबूत होणार आहे, डिजिटल सुविधांच्या उपलब्धतेत सुधारणा होणार आहे तसेच, या भागातील अखेरच्या टोकापर्यंतच्या घटकांच्या समावेशनाला पाठबळ मिळणार आहे.
प्रमुख योजनांअंतर्गत केले गेलेले प्रयत्न (जानेवारी 2026 पर्यंत)
- प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) – एकूण खाती : 2.27 लाखांपेक्षा जास्त
- प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) – नोंदणी : 3.91 लाखांपेक्षा जास्त
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) – नोंदणी : 8.40 लाखांपेक्षा जास्त
- प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) – वितरित रक्कम : 5.78 हजार कोटींपेक्षा जास्त
- अटल पेन्शन योजना (APY) – एकूण सदस्य : 1.18 लाखांपेक्षा जास्त
- प्रधानमंत्री स्वनिधी (PM SVANidhi) – वितरित अर्ज : 3.04 हजारांपेक्षा जास्त
- केसीसी (KCC) कार्डे जारी केली : 25.7 हजारांपेक्षा जास्त
- जल जीवन मिशन : 2.63 लाखांपेक्षा जास्त ग्रामीण घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा जोडणी दिली गेली.
- प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) – 1.95 हजारांपेक्षा जास्त एलपीजी (LPG) जोडण्या दिल्या गेल्या.
- जन औषधी : 18 पेक्षा जास्त जन औषधी केंद्रे कार्यान्वित केली आहेत.
- आयुष्मान कार्डे : 1 लाखांपेक्षा जास्त आयुष्मान कार्डे तयार केली गेली.
- प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) – 5 लाखांपेक्षा जास्त लाभार्थी
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) – 6.29 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पाठबळ पुरवले गेले आहे.