Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना आदरांजली

Published

on

Spread the love

गोवा खबर : पणजीतील आझाद मैदानावर हुतात्मा दिनानिमित्त पुष्पांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री, डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्याच्यावतीने आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहली. पोलीस पथकाने लास्ट पोस्टची धून आळविली. यावेळी हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे स्तब्धता पाळण्यात आली.

मुख्य सचिव डॉ व्ही कांदावेलू, आयएएस, उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अलोक कुमार, आयपीएस, अंकित यादव, आयएएस, केआर चौरासिया, आयपीएस, गोवा दमण आणि दीव स्वातंत्र्य सैनिक संधटनेचे अध्यक्ष रोहिदास देसाई यावेळी उपस्थित होते.

१९४८ मध्ये या दिवशी महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली त्यांच्या स्मरणार्थ ३० जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून स्मरणात ठेवला जातो.