Connect with us

गोवा खबर

‘द केज ऑफ वॉरियर्स’ स्पर्धा दरवर्षी होणार : रवी केसर

Published

on

Spread the love

गोवा खबर : मॅजेस्टिक प्राइडतर्फे २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बॉक्सिंग इव्हेंटला प्रसिद्ध बॉक्सर विजेंदर सिंग यांची उपस्थिती लाभली होती. त्याच अनुभवातून मिक्स्ड मार्शल आर्टस (एमएमए)ला प्रमोट करण्याची संकल्पना आकाराला आली. या मॅजेस्टिक फाइट नाइट स्पर्धेला आम्ही वार्षिक स्पर्धा करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मॅजेस्टिक प्राइड्सचे रवि केसर यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत श्रीनिवास नायक, एमएमएचे शरीफ बाबू आणि प्रसाद यांची उपस्थिती होते.

एमएमए हा बॉक्सिंग, कराटे, रेसलिंग आणि किक बॉक्सिंग यांचा संगम असून, हा खेळ लोकप्रिय होत आहे. मात्र, खेळाडूंना योग्य संधी आणि व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे. अनेक गुणवंत खेळाडू असूनही ते दुर्लक्षित आहेत, विशेषतः जे देशाचे प्रतिनिधित्व करण्याची तयारी ठेवतात. अशा खेळाडूंना संधी देण्यासाठी ‘मॅजेस्टिक फाइट नाइट’ या उपक्रमाची सुरुवात केली, असे केसर म्हणाले.

मॅजेस्टिक प्राइडतर्फे द केज ऑफ वॉरियर्स एमएमए फाइट नाइट २०२६ चे आयोजन सुरू आहे. आज १७रोजी या स्पर्धेतील अंतिम सामने पणजी येथील मॅजेस्टिक प्राइड कॅसिनो येथे सायंकाळी ७ वाजल्यापासून होणार आहेत.

भविष्यात ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून रिअॅलिटी शो तयार करण्याचा आणि निवड झालेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्याचा मानस आहे, अशी माहिती केसर यांनी दिली. या कार्यक्रमात बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील नामवंत व्यक्ती सहभागी होतील तसेच गोव्यात पर्यटनालाही चालना मिळेल, असेही ते म्हणाले.

देश-विदेशांतील खेळाडू या एमएमए स्पर्धेत भारतासोबत इराण, उझबेकिस्तान, कझाखस्तान, युक्रेन, रशिया, इराक, अझेरबायजन यांसारख्या देशातील फाइटर्स सहभागी होणार आहेत. आर्या चौधरी, निर्जला बदायला, डॅवीड लालमालस्वमा, सागर चिल्लर, मृदूल सायकिया हे भारतीय खेळाडून आहेत. खुर्शीदबेक बोझारबो (उझबेकिस्तान), बोगदान कोतलोव्यानोव (युक्रेन), महरम अहमोदव (अझेरबायजन), अली अकबोरपोर (इराण), गियोसबेक बदायला (उझबेकिस्तान), फरखद झोलडासोव (कझाखस्तान), करार रहीम (इराण), इरझहान हानीशबेक उलू (कायगारज रिपल्बिक) व मिकायला दौरबेकोव (रशिया) या खेळाडूंचा यात सहभाग असणार आहे.