Connect with us

गोवा खबर

भाटले, पणजी येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रचार अंतिम टप्प्यात

Published

on

Spread the love

गोवा खबर : हिंदूना संघटित करून धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’साठी कृतीप्रवण करण्याच्या हेतूने हिंदु जनजागृती समितीने शनिवार, १० जानेवारी या दिवशी सायंकाळी ५ वाजता श्री सटी भवानी मंदिर, भाटले, पणजी येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन केले आहे. या सभेचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून प्रचाराला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचाराच्या अनुषंगाने आतापर्यंत महालक्ष्मी मंदिर, पणजी; आपटेश्वर सिद्धिविनायक मंदिर, सांतीनेझ; वरसिद्धिविनायक मंदिर, दोनापावला; मारुति मंदिर, पणजी बसस्थानक; मारुति मंदिर, मळा-पणजी यांसह एकूण पणजी परिसरातील १५ मंदिरांमध्ये येणार्‍या भाविकांना सभेविषयी माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत अनुमाने २ सहस्र लोकांपर्यंत सभेचा विषय पोचला आहे.

भाटले, पणजी येथील सटि भवानी देवीच्या चरणी हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे निमंत्रण ठेवून समितीचे नवीन निवडून आलेले अध्यक्ष रवीश थरडे यांना यांना निमंत्रण देताना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते.

सभेच्या प्रचारामध्ये पणजी येथील ‘जनहित समिती’ने सक्रीय सहभाग घेतला आहे. सभा यशस्वी करण्यासाठी ‘भारत माता की जय’ ही संघटना, तसेच विविध आध्यात्मिक संघटनेचे अनुयायी यांचे बहुमूल्य सहकार्य लाभत आहे. हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ‘हिंदूंना भेडसावणार्‍या आतंकवाद, घुसखोरी आदी समस्या आणि ही दु:स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापण्याची आवश्यकता’, या विषयावर वक्त्यांचे उद्बोधक मार्गदर्शन होणार आहे. हिंदु राष्ट्र-जागृती सभा यशस्वी करण्यासाठी समस्त हिंदूंनी हातभार लावावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.