Connect with us

गोवा खबर

आप’ला मोठा धक्का; अमित पालेकर आणि श्रीकृष्ण परब यांचा राजीनामा

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्याच्या राजकारणात ‘आम आदमी पार्टी’ला (AAP) मोठा हादरा बसला आहे. पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर आणि कार्याध्यक्ष श्रीकृष्ण परब यांनी आपल्या पदासह प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.

पालेकर यांनी स्पष्ट केले की, त्यांनी हा निर्णय रागात घेतलेला नसून आपला स्वाभिमान जपण्यासाठी घेतला आहे. पक्षातील लोकशाही संपुष्टात येत चालली असून, सर्व निर्णय दिल्लीतून ‘वरून’ लादले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद कमी झाल्याने काम करणे कठीण झाले होते, असे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. “माझ्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत, पण सध्या मी कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पुढची दिशा ठरवेन,” असेही त्यांनी स्पष्ट केले.