Connect with us

गोवा खबर

जेटी परिसरात बेकायदा पार्किंगला चाप; २४ तास सुरक्षा रक्षक तैनात होणार

Published

on

Spread the love

गोवा खबर : नदीपात्रात कार बुडाल्याच्या अलीकडील घटनेनंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी पणजी जेटी परिसरात आता २४ तास सुरक्षा रक्षक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

जेटी हे पार्किंगचे ठिकाण नसून तेथे अनधिकृतपणे उभी केलेली वाहने वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. यापुढे अशा वाहनांवर वाहतूक पोलिसांच्या मदतीने कडक कारवाई केली जाईल आणि ही व्यवस्था कायमस्वरूपी लागू केली जाईल.