गोवा खबर : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केंद्र सरकारच्या विशेष आर्थिक साहाय्यातून गोव्यात सुरू असलेल्या ५१२.९१ कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा उच्चस्तरीय आढावा घेतला. मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व खात्यांना समन्वय राखून कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्याची आर्थिक स्थिती आणि खाण उद्योग:
* निधी विनियोग: चालू आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीय तरतुदीतील ५४ टक्के निधी वापरला असून, ३१ मार्चपर्यंत ९५ टक्क्यांपर्यंत मजल मारण्याचा सरकारचा मानस आहे.
* कर्ज मर्यादा: केंद्राने ३,२०० कोटींची मर्यादा दिली असताना राज्याने केवळ १,३०० कोटींचे कर्ज घेतले असून राज्याची आर्थिक स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
* खाण लिलाव: आतापर्यंत १२ खाण ब्लॉकचा लिलाव पूर्ण झाला असून ५ खाणी प्रत्यक्ष सुरू झाल्या आहेत. पुढील महिन्यात आणखी ६ खाण ब्लॉक्सचा लिलाव केला जाणार आहे.