Connect with us

गोवा खबर

सत्तरीसह उसगावमध्ये भाजपची बाजी

Published

on

Spread the love

गोवा खबर : २०२७ च्या विधानसभा निवडणुकीची चुणूक मानल्या जात असलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपने सत्तरी तालुक्यात दमदार कामगिरी केली. वाळपई येथे झालेल्या मतमोजणीनंतर नगरगाव, होंडा, केरी आणि उसगाव या चारही मतदारसंघांत भाजप उमेदवार विजयी झाले.

नगरगाव मतदारसंघातून भाजपचे प्रेमनाथ दळवी यांनी अपक्ष उमेदवार धुळू शेळके यांचा १०,१७५ मतांनी पराभव केला. केरीत भाजपचे नीलेश परवार यांनी विक्रमी १२,१२८ मतांची आघाडी घेत विजय मिळवला, तर होंडामध्ये नामदेव चारी यांनी १० हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली.

सत्तरीतील सर्व जागा जिंकल्यानंतर कार्यकर्त्यांनी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना उचलून धरत जल्लोष केला. डॉ. दिव्या राणे यांनी संपूर्ण तालुक्यात कोपरा बैठका व सभा घेत प्रचाराची धुरा सांभाळली होती. उमेदवारांनी या विजयाचे श्रेय राणे दांपत्याने केलेल्या विकासकामांना दिले.