Connect with us

गोवा खबर

राज्यात आपची जवळपास दोन लाख घरांना थेट भेट ; सासष्टीत दमदार गाठीभेटीनी प्रचाराची सांगता

Published

on

Spread the love
मतदानपूर्व लढाई ; आपच्या वरिष्ठ नेत्यांचा सासष्टीत ठाण मांडून प्रचार
“भाजपविरोधात विश्वासार्ह विरोधक म्हणून जनतेचा फक्त ‘आप’ ला कौल ” – अतिशी
“गोंगाट किंवा खोट्या मैत्रीच्या लढाया नाही तर गेल्या साडेतीन वर्षांच्या कामावर वेळळी मतदान करेल” – आमदार इंजि. क्रूझ सिल्वा
“बाणवली आणि कोलवा येथील आपचे काम लोकांनी पाहिले आहे, झाडूला मतदान करून ते अधिक बळ देतील” – आमदार कॅप्टन व्हेन्झी व्हिएगस 
“नावेलीच्या मतदारांनो भाजप–काँग्रेस घराणेशाही नाकारून बीट्रिस डी’सूझाला निवडून द्या! ” – जर्सन गोम्स
 गोवा खबर : गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आम आदमी पार्टीने मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना सासष्टीत निकराचा प्रचार केला. नावेली,राय, वेळळी आणि कोलवा येथे अंतिम टप्प्यात जोरदार प्रचार करण्यात आला. यानिमित्ताने सासष्टीत आप एक मजबूत दावेदार म्हणून पुढे आली असून मतदानाच्या आधी पक्ष कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
आप गोव्याच्या प्रभारी आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री अतिशी गेल्या जवळपास दोन दिवसांपासून सासष्टीत तळ ठोकून होत्या.त्यांच्यासह पक्षाचे नेते,आमदार, झेडपी उमेदवार आणि कार्यकर्त्यांसोबत घरोघरी जाऊन प्रचार केला.सासष्टीत आप’च्या शेल्डे आणि कोलवा येथे झालेल्या दोन्ही जाहीर सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आपच्या प्रचाराला मोठी गती मिळाली.
आपचे आमदार आक्रमकपणे प्रचारात उतरले,भ्रष्टाचारमुक्त कारभार,गुंडराजला विरोध आणि मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा या आपच्या भूमिकेची माहिती थेट घराघरांत पोहोचविण्यात आली आहे.बुधवारी सकाळी वेळळी झेडपी मतदारसंघात आमदार इंजि. क्रूझ सिल्वा यांनी उमेदवार आणि अतिशी यांच्यासोबत घरोघरी प्रचार केला.
या प्रचारादरम्यान अतिशी म्हणाल्या, “आम्ही अतिशय गांभीर्याने प्रचार करत आहोत आणि आमच्या उमेदवारांना उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. भ्रष्टाचार, गुंडराज, आरोग्य आणि रोजगार या प्रत्येक मुद्द्यावर आपने भाजपला थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे भाजपला पराभूत करण्यासाठी आप कटिबद्ध आहे.
आतापर्यंत गोवाभर आपने १ लाख ९० हजार घरांना भेटी दिल्या आहेत. सासष्टीत प्रचाराच्या अनेक फेऱ्यां करण्यात आल्या. घरोघरी हा प्रचार करण्यात आला.लोक ज्या पद्धतीने आमचे स्वागत करत आहेत, त्यावरून भाजपविरोधातील एकमेव विश्वासार्ह पर्याय म्हणून गोव्याच्या जनतेने आप’चा स्वीकार केला आहे.”
आमदार इंजि. क्रूझ सिल्वा म्हणाले,
“गोव्याचे मतदार, विशेषतः वेळळीचा मतदार हा विरोधकांचा सगळा गोंगाट आणि तथाकथित मैत्रीच्या लढाया दुर्लक्षित करेल. गेल्या ३.५ वर्षांत आम्ही प्रत्यक्षांत जे काम केले आहे, त्यावरच ते मतदान करतील. भाजपविरोधातील लढा मजबूत करण्यासाठी वेळळीचा मतदार आपला कौल आपला देईल.”
बाणवली आणि कोलवाबाबत बोलताना आमदार कॅप्टन व्हेन्झी व्हिएगस म्हणाले,
“बाणवलीत आपने केलेले काम म्हणजेच लोकसेवेची बांधिलकी आहे. मोफत दवाखाने, आरोग्य शिबिरे आणि सरकार अपयशी ठरले तेव्हा लोकांच्या पाठीशी उभे राहणे – हीच आपची राजकारणाची पद्धत आहे.बाणवली आणि कोलवाचे मतदार झाडूला मतदान करून हे काम अधिक मजबूत करतील आणि प्रामाणिक प्रतिनिधी निवडून देतील.”
नावेलीच्या प्रचारावर स्वतः लक्ष ठेवणारे आपचे कार्याध्यक्ष जर्सन गोम्स म्हणाले, “नावेलीमध्ये काँग्रेसचा उमेदवार म्हणजे प्रत्यक्षात भाजपचाच उमेदवार आहे.ही भाजप– काँग्रेसची घराणेशाही लोकांवर लादली जात आहे.नावेलीचे मतदार ही फसवणूक ओळखतात. ते भाजप काँग्रेसचे हे  गठबंधन नाकारून झाडूला मतदान करतील आणि सामान्य कष्टकरी मध्यमवर्गीय महिला बीट्रिस डी’सूझाला निवडून देतील,जी खऱ्या अर्थाने लोकांचे प्रतिनिधित्व करते.”
आपने सांगितले की, सासष्टीत अंतिम प्रचाराचा टप्पा हा थेट जनसंवाद,जबाबदारी आणि लोककेंद्री राजकारणावर केंद्रित असून,तळागाळातील मतदारांचा मजबूत पाठिंबा आणि वाढत्या आत्मविश्वासासह पक्ष मतदानाच्या प्रतीक्षेत निघाला आहे.