गोवा खबर : भारतीय लष्कराने आज बंगालच्या उपसागरातील एका चाचणी क्षेत्रातून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी प्रक्षेपण चाचणी केली. लष्कराच्या दक्षिण कमांडचे ब्रह्मोस युनिट तसेच अंदमान आणि निकोबार कमांडमधील तीनही दलांच्या युनिटने संयुक्तपणे अतिशय सुनियोजित समन्वित मोहीम पार पाडत अचूक लक्ष्यमेद केला.
हे क्षेपणास्त्र प्रगत मार्गदर्शन आणि नियंत्रण प्रणालींनी सुसज्ज आहे. या क्षेपणास्त्राने निर्धारित लक्ष्यावर अचूकपणे मारा करून आपली कार्यक्षमता, उच्च वेगाने उड्डाण करण्यातानाचे स्थैर्य आणि निर्धारीत लक्ष्य भेदण्याची अचूकता सिद्ध केली. या मोहीमेअंतर्ग प्रत्यक्ष युद्धसदृश्य परिस्थितीतले वातावरण निर्माण केले होते, आणि अशा परिस्थितीतल्या कार्यवाहींची सर्व उद्दिष्ट्ये पूर्ण केली गेली. यामुळे भारतीय सेनेच्या ब्रह्मोस युनिट्सची उच्च कार्यान्वयीन सज्जता आणि उदयोन्मुख युद्धभूमीवरील आव्हानांचा सामना करण्याच्या दृष्टीने वास्तव वेळेत, अचूक मारा करण्याची मोहीम पार पाडण्याची क्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
परम विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक प्राप्त दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या यशस्वी लढाऊ प्रक्षेपणाची प्रशंसा केली.
ZDY3.jpeg)
हे यशस्वी प्रक्षेपण लष्कराची दीर्घ पल्ल्याचे लक्ष्य अचूकतेने भेदण्याची क्षमता वाढवण्याच्या आणि प्रतिबंधक क्षमता मजबूत करण्याच्या प्रयत्नांतील एक प्रमुख टप्पा ठरले आहे. या प्रक्षेपणाने भारताच्या स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालीची अचूकता, विश्वसनीयता आणि परिणामकारकता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. यातून देशाच्या धोरणात्मक आणि तंत्रज्ञान क्षमतांमधील मजबूत प्रगतीही ठळकपणे दिसून आली आहे.
हे यश आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत भारताच्या आत्मनिर्भरतेच्या वचनबद्धतेचा दाखला आहे.