Connect with us

गोवा खबर

 करण सिंग त्यागी यांना 56 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट पदार्पणीय दिग्दर्शक पुरस्कार

Published

on

Spread the love


माहिती आणि प्रसारण तसेच संसदीय कार्य राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

चित्रपटाची सिनेमॅटिक मूल्ये आणि ऐतिहासिक संदर्भाने असलेल्या महत्त्वाचा परीक्षक मंडळाकडून गौरव

 

 

गोवा खबर:उदयोन्मुख चित्रपट प्रतिभेचा गौरव करणाऱ्या एका ऐतिहासिक क्षणी, 56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज करण सिंग त्यागी यांना त्यांच्या ‘केसरी चॅप्टर 2’ या चित्रपटासाठी भारतीय चित्रपटांसाठीच्या सर्वोत्कृष्ट पदार्पणीय दिग्दर्शकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  इफ्फीच्या आज झालेल्या समारोप समारंभात माहिती आणि प्रसारण तसेच संसदीय कार्य राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या हस्ते करण सिंग त्यागी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू उपस्थित होते. केसरी चॅप्टर 2 या चित्रपटाने समीक्षकांची प्रचंड वाहवा मिळवली होती.

चित्रपट दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता असलेले त्यागी यांनी त्यांच्या वेधक कथात्मक मांडणीच्या शैलीने आणि अर्थपूर्ण कथा मांडण्याच्या सातत्यपूर्णतेने भारतीय सिने जगतात स्वतःचे एक विशिष्ट स्थान निर्माण केले आहे. ‘बंदिश बँडिट्स’ आणि ‘कालकूट’ यांसारख्या उल्लेखनीय चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे, तर ‘केसरी चॅप्टर 2’ या चित्रपटातून त्यांनी दखल घ्यायलाच हवी अशा दिग्दर्शकाच्या स्वरुपात स्वतःला प्रस्थापित केले आहे.

परीक्षक मंडळाने ही या चित्रपटाची प्रशंसा केली. या पुरस्काराच्या माध्यमातून परीक्षक मंडळाने या चित्रपटातील सिनेमॅटिक मूल्ये, ऐतिहासिक संदर्भाने या चित्रपटाचे महत्व आणि चित्रपटात दाखवलेल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील रोमांचक क्षणांची दखल परीक्षक मंडळाने घेतली. हा चित्रपट म्हणजे एक दृश्यात्मक सादरीकरणातली उत्कृष्टता असून, आपण ‘केसरी चॅप्टर 2’ चे दिग्दर्शक, निर्माते, कलाकार आणि तंत्रज्ञांचे अभिनंदन करू इच्छितो अशी भावना  इंडियन पॅनोरमा विभागाच्या परीक्षकांनी आणि अध्यक्षांनी व्यक्त केली.

‘केसरी चॅप्टर 2’ हा चित्रपटातून, शंकरन नायर या केरळमधील एका  निर्भीड बॅरिस्टरची असामान्य सत्य कथा मांडली आहे. शंकरन नायर यांनी जालियनवाला बाग हत्याकांडामागील सत्य उघड करण्यासाठी ब्रिटिश साम्राज्याला आव्हान दिले होते. व्हाईसरॉय परिषदेचे सदस्य या नात्याने, नायर यांनी जनरल डायरने निशस्त्र नागरिकांवर मुद्दाम गोळीबार केल्याचे खोडता न येणारे पुरावे उघड केले. शेकडो पीडितांसाठी न्यायाची मागणी करत त्यांनी, दिलरीत गिल या युवा वकीलाच्या सोबतीने त्यांनी वसाहतवादी राजवटी विरोधात  एक धाडसी कायदेशीर लढा उभारला होता.

हा चित्रपटात केवळ नायर यांच्या अद्वितीय धैर्याचे चित्रण केलेले नाही, तर त्यासोबतच त्यांच्या कृतींनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात कशारितीने ठिगणी पेटवली होती, या भावनाही पडद्यावर सक्षमपणे साकारल्या आहेत.  न्यायालयातील चित्तवेधक नाट्यमय घाडामोडींनी भारलेला आणि कलाकारांच्या भारदस्त अभिनयाची साथ लाभलेल्या  ‘केसरी चॅप्टर 2’ मधून भारतीय इतिहासातील फारच कमी जणांना ठाऊक असलेल्या या घडामोडी, सिनेमॅटिक उत्कृष्टतेने आणि उत्कट भावनांच्या आधारे मांडल्या आहेत.

भारतीय चित्रपटांसाठीचा सर्वोत्कृष्ट पदार्पणीय दिग्दर्शकाचा पुरस्कार म्हणजे, देशाच्या सर्जनशील क्षेत्राला नवीन दिशा देणाऱ्या, ताज्या दमाच्या अभिव्यक्तीला प्रोत्साहन देण्याबद्दलच्या IFFI च्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचाच एक भाग आहे. यावर्षी, परीक्षक मंडळाने  या पुरस्कारासाठी कल्पक कथात्मक मांडणी, प्रादेशिक विविधता आणि द्रष्टी  सिनेमॅटिक समज या पैलुंचे दर्शन घडवणाऱ्या उत्कृष्ट पदार्पणीय फीचर चित्रपटांची निवड केली होती.

आपला पहिलाच चित्रपट बनवलेल्या  चित्रपट दिग्दर्शकांची सर्जनशीलता आणि क्षमतेचा दखलपूर्ण गौरव करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार सुरू करण्यात होता. या पुरस्काराच्या माध्यमातून आपल्या पहिल्या कलाकृतींमधून त्यांच्यातील उल्लेखनीय क्षमता आणि कलात्मक योग्यता दिसून येते अशा दिग्दर्शकांचा गौरव केला जातो. महोत्सवाच्या नियमांनुसार दरवर्षी पाच पदार्पणीय चित्रपटांची निवड करून ते प्रदर्शित केले जातात. 5 लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

करण सिंग त्यागी यांच्यासारख्या पदार्पणीय दिग्दर्शकांचा गौरव करून, IFFI ने धाडसी कल्पना, नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि परिवर्तनीय कथानकांच्या माध्यमातून भारतीय सिनेमाचे भविष्य घडवण्याची क्षमता असलेल्या, भावी पिढ्यांमधील कथात्मक मांडणीकारांना  प्रोत्साहन देत राहण्याची आपली वचनबद्धता पुन्हा एकदा ठामपणे व्यक्त केली आहे.

Continue Reading