Published
8 months agoon
गोवा खबर : 56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासोबत, आयोजित करण्यात आलेल्या वेव्हज फिल्म बाजार 2025 चा आज उत्साहपूर्ण समारोप झाला. चित्रपट निर्मिती, सहकार्य आणि या क्षेत्राशी संबंधित बाजारपेठेचा विस्तार यासाठी भारत एक उदयोन्मुख जागतिक केंद्र म्हणून आपले स्थान निर्माण करत असल्याचे यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले. या उपक्रमाच्या यावर्षीच्या आवृत्तीला अभूतपूर्व आंतरराष्ट्रीय सहभाग लाभला, ऐतिहासिक भागीदारी स्थापित झाल्या आणि आशय निर्माते, वितरक तसेच या क्षेत्राशी संबंधित उद्योग व्यावसायिकांसाठी असंख्य संधीही उपलब्ध झाल्या.
अभूतपूर्व जागतिक सहभाग
यावर्षीच्या या पाच दिवसीय बाजारात, 40 हून अधिक देशांतील 2,500 हून अधिक प्रतिनिधींनी सहभागघेतला, आणि हा उपक्रम दक्षिण आशियातील अशा प्रकारच्या सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय आयोजनांपैकी एक ठरला. सादरीकरणे पाहण्यासाठीचे दालन, सह निर्मितीसाठीचा बाजार, पटकथा लेखकांची प्रयोगशाळा आणि या बाजारपेठेसाठीचे विशेष खेळ, अशा विविध उपक्रमांमध्ये 15 हून अधिक देशांचे प्रतिनिधित्व करणारे एकूण 320 प्रकल्प प्रदर्शित करण्यात आले. या सहभागातून भारताच्या आशय सामग्री व्यवस्थेमधील जगाचे मजबूत स्वारस्य दिसून आले.
मोठ्या प्रमाणातील व्यावसायिक व्यवहार आणि बाजारपेठेवरील प्रभाव
वेव्हज फिल्म बाजार 2025 ने परस्पर संपर्काचे जाळे, सहकार्य आणि करार करण्यासाठी एक बहुआयामी वातावरण उपलब्ध करून दिले होते:
या सर्व घडामोडींमुळे वेव्हज फिल्म बाजार हा दक्षिण आशियातील सर्वात प्रभावशाली चित्रपट बाजार म्हणून उदयाला आल्याचे ठळकपणे अधोरेखित झाले. परिणामी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कथात्मक मांडणीकार, निर्माते-दिग्दर्शक, वितरक आणि गुंतवणूकदारांसाठी असंख्य संधी उपलब्ध झाल्या आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया मधील परस्पर सहकार्याला बळ : चार मोठे सामंजस्य करार
वेव्हज फिल्म बाजार 2025 मध्ये ऑस्ट्रेलियातील माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासोबतच्या चार महत्त्वाच्या सामंजस्य करारांवरही स्वाक्षरी करण्यात आल्या. ही एक ऐतिहासिक घडामोड ठरली. या करारामुळे शिक्षण, वितरण, प्रतिभेचा विकास आणि महोत्सव विषयक देवाणघेवाण यासह विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार घडून आला आहे.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, एनएफडीसी आणि मेलबर्न येथील भारतीय चित्रपट महोत्सव यांच्यातील सामंजस्य करार
महोत्सव देवाणघेवाण, उत्पादक प्रयोगशाळा आणि नवीन वेव्हज बाजार-आयएफएफएम सह-वितरण निधीद्वारे भारत-ऑस्ट्रेलियन सिनेनाते मजबूत करण्यासाठी तीन वर्षांची धोरणात्मक भागीदारी. या सहकार्यामुळे दोन्ही देशांमध्ये क्युरेटेड स्क्रीनिंग, प्रीमियर, प्रशिक्षण कार्यक्रम आणि सर्जनशील प्रकल्पांच्या संयुक्त प्रोत्साहनाला चालना मिळेल.
इतर आंतरराष्ट्रीय महोत्सवांसोबत मजबूत सहकार्य
वेव्हज फिल्म बाजार 2025 हे प्रमुख आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसोबत भारताचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून उदयास आले. एका महत्त्वपूर्ण घडामोडीत रेनडान्स फिल्म फेस्टिव्हल (यूके), ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हल लिस्बोआ आणि बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (दक्षिण कोरिया) यांनी आपल्या आगामी आवृत्त्यांमध्ये भारताची ‘फोकस कंट्री’ म्हणून गणना करण्यास स्वारस्य दर्शविले आहे.
वेव्हएक्स स्टार्टअप पॅव्हेलियनने इफ्फी 2025 मध्ये 14 क्रिएटिव्ह-टेक इनोव्हेटर्सचे प्रदर्शन केले.
वेव्हएक्स स्टार्टअप पॅव्हेलियनने वेव्हज फिल्म बाजार येथे क्रिएटिव्ह, मीडिया आणि मनोरंजन-तंत्रज्ञान क्षेत्रातील 14 उदयोन्मुख स्टार्टअप्सना सहभागी करून एक महत्त्वाचा टप्पा गाठला.

या सहभागामुळे WaveX स्टार्टअप्सना हे करता आले:

Valpoi Police Seize Ganja Worth ₹5 Lakh; Two Arrested from Orissa
MLA Viresh Borkar Halts Alleged Illegal Road Construction in Curca
साळावली जल प्रकल्पातून मर्यादित प्रमाणात पाणी पुरवठा
Congress and Goa Forward Party to Strengthen Alliance in the Larger Interest of Goa
Aam Aadmi Party Goa’s Alliance Coordination Committee meets in Panaji; every effort to be made for opposition alliance
WAR ON DRUGS! Goa CM Pramod Sawant Mobilizes State Machinery in Massive Push For a ‘Drug-Free Goa’ Under PM Modi’s Vision!