Connect with us

गोवा खबर

जिओने अपग्रेड केला AI ऑफर, आता सर्व अनलिमिटेड 5G युजर्सना मिळणार मोफत Gemini 3 एक्सेस

Published

on

Spread the love
• जिओच्या सर्व अनलिमिटेड 5G युजर्सना 18 महिन्यांपर्यंत Gemini Pro Plan मोफत
• ऑफरची मार्केट व्हॅल्यू ₹35,100
• गूगलचा अत्याधुनिक Gemini 3 मॉडेल ऑफरमध्ये समाविष्ट
• MyJio अॅपमधील “Claim Now” वर क्लिक करून तत्काळ अॅक्टिवेशन, ऑफर 19 नोव्हेंबर 2025 पासून लागू

गोवा खबर : जिओने आपल्या AI ऑफरत मोठा बदल केला आहे. या ऑफरअंतर्गत आता Jio Gemini Pro Plan सर्व जिओ अनलिमिटेड 5G युजर्ससाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध असेल. या प्लानमध्ये गूगलचे नवीन आणि अत्याधुनिक Gemini 3 मॉडेल देण्यात आले असून त्यामुळे युजर्सना अधिक प्रगत आणि स्मार्ट AI अनुभव मिळणार आहे.

यापूर्वी हा ऑफर फक्त निवडक युवा ग्राहकांसाठी होता, मात्र आता कंपनीने तो संपूर्ण अनलिमिटेड 5G युजर बेसपर्यंत वाढवला आहे. यामुळे प्रगत AI तंत्रज्ञान प्रत्येक भारतीयाच्या हातात पोहोचवण्याच्या दिशेने जिओने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

कंपनीच्या माहितीनुसार, सर्व जिओ अनलिमिटेड 5G ग्राहकांना 18 महिन्यांसाठी ₹35,100 किमतीचा Gemini Pro Plan मोफत मिळणार आहे. ही सुविधा 19 नोव्हेंबर 2025 पासून सर्वांना उपलब्ध होईल आणि MyJio अॅपमधील “Claim Now” बॅनरवर क्लिक करताच ती तत्काळ अॅक्टिवेट होईल.