-
१८ व २० नोव्हेंबर रोजी परेडदरम्यान रस्ते बंद, वाहतूक वळवली जाणार : पोलिसांची माहिती
गोवा खबर : ५६व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) उद्घाटन परेडच्या निमित्ताने १८ आणि २० नोव्हेंबर रोजी पणजी शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे विशेष नियोजन जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
१८ नोव्हेंबर रोजी परेडच्या सरावावेळी दुपारी ३ ते ५ दरम्यान जुने सचिवालय–कला अकादमी दरम्यानचा डी.बी.बी. मार्ग पूर्णपणे बंद राहणार आहे.
२० नोव्हेंबर रोजी परेड दिनी, विविध राज्यांचे चित्ररथ मेरशे जंक्शन आणि दिवजा सर्कल येथे एकत्र येतील. दुपारी १ पासून सर्व चित्ररथ जुने जीएमसी–डी.बी.बी. मार्ग याच्या डाव्या लेनमध्ये लाईन-अपसाठी उभे केले जातील.
शहरात येणारी वाहतूक अशाप्रकारे वळवली जाईल
पाटो ब्रिज–दिवजा सर्कल–एमएलसीपी मार्गे शहरात प्रवेश
बांबोळीहून येणारी वाहतूक मळा ब्रिज व भाटले मार्गे
रायबंदर ते पणजी वाहतूक रायबंदर कॉजवे–मेरशे अंडरपास मार्गे
परेड सुरू होताच सिटी बसेसना दोन्ही बाजूंनी प्रवेश बंद राहील.
२० ते २८ नोव्हेंबर दरम्यान जनरल बर्नाड रोड पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल.
नो-पार्किंग झोन
१८ व २० नोव्हेंबर रोजी खालील रस्त्यांवर पार्किंग मनाई:
जोसे फाल्काओ रोड, जाओ कॅस्ट्रो रोड, एम.जी. रोड (मॅच कॉर्नर–कासा इंटरनॅशनल), काकुलो आयलंड–सांतीनेज जंक्शन, चर्च स्क्वेअर–कोर्टिन फुटब्रिज इत्यादी.
पार्किंग व्यवस्था
पास असलेल्या गटांसाठी:
A: PVR INOX
S1/S2: कला अकादमी (पिकअप/ड्रॉप)
S4: मार्केट लेन (मीडिया)
पास नसलेली वाहने:
उत्तर गोवा – EDC प्लाझा / MLCP / KTC
दक्षिण गोवा – GMC बांबोळी–गोवा विद्यापीठ–NIO–मिरामार–कांपाल फुटबॉल ग्राऊंड
पणजीतील सर्व सरकारी कार्यालयांना ‘हाफ डे’
इफ्फी उद्घाटन परेडमुळे २० नोव्हेंबर रोजी पणजीतील सर्व सरकारी व स्वायत्त संस्थांना अर्धा दिवस सुटी जाहीर करण्यात आली आहे.