Connect with us

गोवा खबर

भाडेकरूंची माहिती देण्याचे आदेश

Published

on

Spread the love

गोवा खबर : दक्षिण गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी एका आदेशाद्वारे दक्षिण गोवा भागातील सर्व हॉटेल्स, लॉजिंग आणि बोर्डिंग, खाजगी गेस्ट हाऊस, पेइंग गेस्ट निवास, तात्पुरती निवासी व्यवस्था करणाऱ्या घर मालकांना, धार्मिक संस्थाना आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांची ओळख पटविण्यासाठी ग्राहकांकडून मतदार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, स्मार्ट कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट यासारख्या ओळखपत्रांची मागणी करावी. ओळख पटविल्याशिवाय ग्राहकांना आपल्या हॉटेलात किंवा घरांत प्रवेश देऊ नये.

तसेच भाडेकरूंची माहिती  जवळच्या पोलीस स्टेशवर द्यावी. मालकांनी आपल्या ग्राहकांची आणि भाडेकरूंची माहिती जतन  करून ठेवावी आणि गरज असते तेंव्हा अशी माहिती पोलीस यंत्रणेस उपलब्ध करावी.

त्याचप्रमाणे, दक्षिण गोवा जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या प्रमुखांनी त्यांच्या एटीएमच्या सुरक्षेसाठी चोवीस तास सुरक्षा रक्षक तैनात करावेत आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत किंवा पॅनिक बटण हूटर, सीसीटीव्ही कॅमेरे, टू-वे कम्युनिकेशन सिस्टम आणि रिमोट आउटस्टँडिंग कंट्रोलने सुसज्ज ईएसएस (इलेक्ट्रॉनिक सर्व्हे सिस्टम) बसवावे.

हा आदेश ५ नोव्हेंबर २०२५ पासून लागू झाला आहे आणि तो ६० दिवसांच्या कालावधीसाठी लागू राहील. भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होईल असे आदेशात पुढे म्हटले आहे.