Connect with us

गोवा खबर

गरजवंतांना मदत म्हणजेच खरा वाढदिवस : आमदार आरोलकर

Published

on

Spread the love

गोवा खबर : जंगी पार्टी करण्यापेक्षा गरजूंना मदत करून त्यांचा आनंद वाढवणे हेच खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरे करणे आहे, असे मत मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी व्यक्त केले.

मांद्रेतील दीनदयाळ सभागृहात आमदार आरोलकर यांचे वडील विनायक आरोलकर यांचा ८०वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी समाजोपयोगी उपक्रम राबवत शेतकऱ्यांना पावर टिलर, माड चढाई यंत्र, अपंगांना व्हिलचेअर आणि महिलांना शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले.

आरोलकर म्हणाले, आजवर जे काही साध्य केले ते माझ्या आई-वडिलांच्या आशीर्वादामुळे शक्य झाले. समाजातील गरजूंना पुढेही मदत करत राहू.

कार्यक्रमात स्थानिक पंच सदस्य, सरपंच, आणि लाभार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरज नाईक यांनी केले.